गांडूळखतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्र्व्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असून वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते. गांडूळखत हे भरपूर अन्नद्र्व्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रीय खत असून जैविक गुणधर्म वाढविते. गांडूळखत हा सेंद्रीय शेतातील एक महत्त्वाचा घटक आहे.
इतर रासायनिक खतावर पूर्णतः अवलंबून न राहता स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल.
झाडांना, पिकांना पाणी देण्याचे प्रमाण कमी होत असल्याने मिळणारे उत्पादन जास्त व चांगल्या दर्जाचे असल्याने शेतमालाची चांगली किंमत येते.
पाणी देण्याचा कालावधी कमी होतो
जमिनीची उत्पादन क्षमता वाढते.
गांडूळखत निर्मितीमुळे ग्रामीण भागात बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलबध होते.
मजूर वर्गावर होणारा खर्च कमी.
रासायनिक खताचा खर्च कमी आणि पिकाच्या निरोगी वाढीमुळे कीटकनाशकाच्या खर्चात बचत.
माती च्या दृष्टिने गांडूळांचे व गांडूळ खता चे उपयोग:
गांडूळामुळे जमिनीचा पोत सुधारतो.
जमिनीतील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत भरपूर वाढ होते.
बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.
गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवितात.
जमिनीत पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढते.
जमिनीत हवा खेळती राहून मुळांची वाढ चांगली होते.
मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो.
जमिनीचा सामू ( पी.एच.) योग्य पातळीत राखला जातो.
गांडूळांच्या बिळांमुळे झाडांच्या मुळांना इजा न होता जमिनीची नैसर्गिक मशागत केली जाते.
गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्याने नत्र, स्फुरद पालाश व इतर सूक्ष्मद्रव्ये झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात.
गांडूळामुळे जमिनीची धूप कमी होते.
Source: http://www.mahaagri.gov.in/
Safe Payment
7 Days Return Policy
100% Authentic Products